google-site-verification: googlea24dc57d362d0454.html आजीच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी श्री स्वामी समर्थ मूर्तीला स्टेथोस्कोप लावला आणि ....................एकदा वाचाच श्रद्धा आजींची .

आजीच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी श्री स्वामी समर्थ मूर्तीला स्टेथोस्कोप लावला आणि ....................एकदा वाचाच श्रद्धा आजींची .

https://shrikant89.blogspot.com                 


         एका वयस्कर आजींची श्री स्वामी समर्थांवर निस्सीम भक्ती होती. त्या रोज स्वामींच्या मूर्तीला दूध पाणी घालून, स्वच्छ धूवून, गंध, अक्षता, फुलं वाहून खडिसाखरेचा नेवैद्य दाखवत.  मगच त्या स्वतः चहा घेत. वर्षानूवर्ष त्यांच्या या नियमात कधीच खंड पडला नाही. थकत्या वयात आजींचे हात थरथरत, पाय लटपटत तरीही  त्या नियमाने  आपला नेम बरोबर न चुकता करत.

         एकदा त्या अंगणात फुलं आणायला गेल्या व फुलं आणून देवघरात पाटावर येऊन बसल्या तसं त्यांना हात थरथर कापतोय असं जाणवलं. तरीही  स्वामींची मूर्ती उचलून ताम्हणात ठेवायचा प्रयत्न केला, पण आजीच्या हातातुन निसटून ती जमीनीवर पडली. मोठा आवाज ऐकून सुनबाई धावतच आली. तर आजीबाई  रडत होत्या. तिला वाटलं ताम्हण पायावर पडलं की के  पण पहाते तर स्वामींची चांदिची मूर्ती जमीनीवर पडलेली होती.

          तिने मुर्ती उचलली  कपाळी लावली व ताम्हणात ठेवली. आजींचा गोंधळ सुरूच होता, स्वामी पडले,असं कसं काय झालं. मी गाफिल राहिले, माझ्या हातून निसटले, पडले गं पडले. केवढं मोठ  टेंगूळ आलंय बघ. कसे कासावीस झाले आहे. चल लवकर डॉक्टरला फोन कर, बोलव लवकर. आजींनी सुनेच्या मागेच हट्टच लावला.

        शेवटी तिने फोन डॉक्टर ला फोन केला. तिचा भाचाच  डॉक्टर असल्याने तो म्हणाला, पेशंट्स आटपून आलोच  तासाभरात. तेवढा वेळ आजीबाई  गप्प बसेनात, असं कर तू स्कूटिवर स्वामींना घेऊन जा. लवकर औषध-पाणी केलं पाहिजे. सुनेला वेगळच वाटले ,असं कसं लोक काय म्हणतील. म्हातारीच  एक ठिकंय पण सुन ही नाटके  करतेय. सुन म्हणाली येतायत डॉक्टर तोपर्यंत आपण थांबु, काहितरी करू,आजींनी फ्रिजमधून बर्फ मागीतला. स्वामींना बर्फ फिरवला  दिला डबीतून हळद काढून लेप लावला. तोपर्यंत डॉक्टर आले, सुनेने देव खोलीत प्रवेश करण्याआधी डॉक्टरांना हात पाय धूवायला नेताना सर्व काय झाले ते सांगितले. त्या  डॉक्टरला गंमत वाटली.

           देवघरात येऊन मोठ्या गांभीर्याने तो स्वामींना तपासत असताना अचानक  त्याला एक जाणवलं हि हि मूर्ती गरम कशी.. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघतअसताना  आजी म्हणाल्या ताप आहे का रे ? तपास बाबा नीट, डॉक्टरांनी आजींच्या समाधान करण्यासाठी  मुर्तीला स्टेथोस्कोप लावला अन् काय आश्चर्य.

            त्या मूर्तीमधून हृदयाचे धोके  ऐकू येत होते.. तो दचकला,भांबावून गेला व सुनेला म्हणाला आत्या खऱंच आजींची श्रद्धा खूप मोठी आहे. त्यांनी स्टेथोस्कोप सुनबाईला ऐकवला, तिचेही  डोळे भरून आले. डॉक्टरांनी मुर्तीला सतत गार पाण्याचा अभिषेक करण्यास संगीतला. आणि खरोखरच आराम पडला स्वामींना व आजींबाईंना .....

                                           श्री स्वामी समर्थ


Post a Comment

0 Comments

Close Menu