google-site-verification: googlea24dc57d362d0454.html
चिटणिसाची
कार्यपद्धती- इयत्ता बारावी
प्रश्न.१ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(प्रत्येकी १ गुण)
प्रकरण १ : संस्थात्मक वित्त
व्यवस्थापनाची ओळख
(१) --------हे
पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे.
(अ) उत्पादन (ब) विपणन
(क) वित्त
(२) संस्थात्मक
वित्तव्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेल्या-------- संपादन व त्याचा
विनियोग या गोष्टींची हाताळणी करते.
(अ) मालाचे (ब)
भांडवलाचे (क) जमिनीचे
(३) कंपनीला
सरकारकडे ------भरावा लागतो.
(अ) कर (ब) लाभांश
(क) व्याज
(४) -------म्हणजेच
कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय. .
(अ) अधिकृत भांडवल (ब)
विक्रीस काढलेले भांडवल (क) स्थिर भांडवल
(५) चालू संपत्तीचे
चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजेच ------होय.
अ) खेळते
भांडवल (ब) भरणा झालेले भांडवल क) अभिदत्त भांडवल
(६) उत्पादन
उदयोगाला स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी --------प्रमाणावर निधी
गुंतवावा लागतो.
अ) मोठ्या
(ब) छोट्या (क) कमीत कमी
(७) लोकसंख्या उच्च
दराने वाढत असल्यास काही उत्पादकांना ही व्यवसाय ----- संधी आहे असे वाटते.
अ) बंद
करण्यासाठी (ब) वाढवण्यासाठी (क) कमी करण्यासाठी
(८) एकूण -------म्हणजेच
व्यवसायातील खेळते भांडवल.
(अ) खर्च (ब) चालू
मालमत्ता (क) चालू दायित्व
उत्तरे :
१) वित्त हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन
यांच्याशी निगडित आहे.
(२) संस्थात्मक
वित्तव्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेल्या भांडवलाचे संपादन व
त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते.
(३) कंपनीला
सरकारकडे कर भरावा लागतो.
(४) स्थिर भांडवल
म्हणजेच कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय.
(५) चालू संपत्तीचे
चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजेच खेळते भांडवल होय.
(६) उत्पादन
उदयोगाला स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा
लागतो.
(७) लोकसंख्या उच्च
दराने वाढत असल्यास काही उत्पादकांना ही व्यवसाय वाढवण्यासाठी संधी आहे असे
वाटते.
(८) एकूण चालू
मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल.
विदयार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत उत्तर लिहिताना वर दाखवल्या प्रमाणे प्रत्येक विधान पूर्ण लिहून रिकाम्या जागी भरलेले शब्द अधोरेखित करणे अपेक्षित आहे.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
(१) जे गुंतवणूकदार
जोखीम उचलण्यासाठी तयार असतात, ते------- भागांमध्ये गुंतवणूक करतात.
(अ) अग्रहक्क (ब)
समहक्क क) बोनस
(२) चालू मालमत्ता व
चालू दायित्व यांमधील फरक म्हणजेच ---------भांडवल होय
(अ) कर्जाऊ (ब)
स्थिर (क) चालू
(३) उधारीच्या
अटींवर विक्री करणाऱ्या व्यवसायास--------- खेळत्या भांडवलाची
गरज असते.
(अ) जास्त (ब)
मध्यमस्वरूपी (क) कमी
(४) रोख विक्री
करणाऱ्या व्यवसायास --------खेळत्या भांडवलाची
गरज असते.
(अ) कमी (ब) जास्त
(क) मध्यमस्वरूपी
(५) विक्रीचे प्रमाण
वाढले, तर खेळत्या भांडवलाचे प्रमाण-----------
(अ) वाढते (ब) कमी
होते (क) तसेच राहते
उत्तरे :
(१) समहक्क (२) चालू
(३) जास्त (४) कमी (५) वाढते.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण २ : संस्थात्मक वित्त
व्यवस्थेचे स्रोत
(१) --------हा
भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे.
(अ) कर्जरोखा (ब)
बंधपत्र क) भाग
(२) ठेव पावतीचा
फायदा म्हणजे--------- बाजारात भांडवल उभे करण्याची क्षमता होय.
(अ) राष्ट्रीय (ब)
स्थानिक (क) आंतरराष्ट्रीय
(३) -----------हे
कंपनीच्या मालमत्तेच्या उर्वरित भागाचे दावेदार असतात.
(अ) बंधपत्रधारक (ब)
समहक्क भागधारक (क) कर्जरोखेधारक
(४) -------------कंपनीच्या
व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो.
(अ) अग्रहक्क
भागधारकांचा (ब) ठेवीदारांचा क) समहक्क भागधारकांचा
(५) ---------हे
समहक्क भागधारकास ‘बक्षीस' म्हणून विनामूल्य दिले जातात.
(अ) अधिलाभांश भाग
(बोनस भाग) (ब) हक्क भाग (क) समहक्क भाग
(६) अग्रहक्क
भागधारकास---------- दराने लाभांश मिळण्याचा हक्क असतो
(अ) निश्चित (ब)
चढउतार होणाऱ्या (क) किमान
(७)--------अग्रहक्क
भागांना संचित लाभांश दिला जातो.
(अ) परतफेडीच्या (ब)
संचयी (क) परिवर्तनीय
(८) -----------अग्रहक्क
भागधारकांना समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा अधिकार असतो.
(ब) परिवर्तनीय (क)
परतफेडीचे
(९) कर्जरोखेधारक हे
कंपनीचे ---------असतात.
(अ) धनको (ब)
मालक (क) पुरवठादार
(१०) कर्जाऊ भांडवलावर
---------दिले जाते.
(अ) व्याज (ब) सूट
(क) लाभांश
उत्तरे :
(१) भाग (२)
आंतरराष्ट्रीय (३) समहक्क भागधारक (४) समहक्क भागधारकांचा (५) अधिलाभांश भाग (बोनस
भाग) (६) निश्चित (७) संचयी (८) परिवर्तनीय (९) धनको (१०) व्याज.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
(१)
कर्जरोखेधारकांना निश्चित -----दराने मिळते.
(अ) व्याज (ब)
लाभांश (क) सूट
(२) एका ठरावीक
कालावधीनंतर परिवर्तनीय कर्जरोख्यांचे--------- मध्ये परिवर्तन होते.
(अ) समहक्क भाग .(ब)
ठेवी (क) बंधपत्रे
(३) बंधपत्रधारक हा
संस्थेचा ------असतो.
(अ) सचिव (ब) मालक
(क) धनको
(४) कंपनी कमीत कमी ----------महिन्यांसाठी
ठेवींचा स्वीकार करते.
(अ) सहा (ब) नऊ (क)
बारा
(५) कंपनी जास्तीत
जास्त ----------महिन्यांकरिता ठेवींचा स्वीकार करते.
(अ) १२ (ब) २४ क) ३६
(६) अमेरिकन ठेव
पावतीची विक्री ---------मध्ये होते.
(अ) लंडन (ब) जपान
(क) यूएसए (अमेरिके)
(७) ज्या ठेव
पावतीची विक्री अमेरिकासोडून इतर राष्ट्रांच्या भाग बाजारात केले जाते, त्या ठेव
पावतीला --------म्हणतात.
(अ) जागतिक ठेव
पावती (ब) अमेरिकन ठेव पावती क) मुदत ठेव पावती
(८) कर्जरोख्यांची
विक्री करून------- भांडवल उभारले जाते.
(अ) कर्जाऊ (ब)
मालकी (क) अंतर्गत
(९) -------हा
दस्तऐवज कर्ज घेतलेल्याचा पुरावा म्हणून सरकारकडून अथवा व्यवसाय संस्थेकडून
निर्गमित केला जातो.
(अ) कर्जरोखा (ब)
बंधपत्र (क) व्यापारी कर्ज
उत्तरे-
(१) व्याज (२)
समहक्क भागामध्ये (३) धनको (४) सहा (५) ३६ (६) यूएसए (अमेरिके) (७) जागतिक ठेव
पावती (८) कर्जाऊ (९) बंधपत्र.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण ३ : भाग विक्री
(१) -----म्हणजे
समहक्क व अग्रहक्क भागांच्या विक्रीतून उभारलेले भांडवल होय.
(अ) भाग भांडवल (ब)
कर्जाऊ भांडवल (क) राखीव निधी
(२) -------म्हणजे
जनतेला केलेली भागांची विक्री होय.
(अ) हक्क भाग (ब)
खाजगीरीत्या विक्री (क) सार्वजनिक भाग विक्री
(३) लिलावात
केलेल्या किमतीवर आधारित असलेली भाग विक्री किंमत म्हणजे -------पद्धत होय.
(अ) बुक बिल्डिंग
(ब) स्थिर किंमत विक्री (क) बोनस भाग विक्री
(४) कंपनी पहिल्या
वेळेस जनतेला -----------करून भागांची विक्री करते.
(अ) पुढील सार्वजनिक
विक्री (ब) प्राथमिक भाग विक्री (क) सार्वजनिक विक्री
(५) ----------बोनस
भाग विनामूल्य दिले जातात.
(अ) विदयमान समहक्क
भागधारकांना (ब) विदयमान कर्मचाऱ्यांना (क) संचालकांना
(६) कंपनीच्या कायम
कर्मचाऱ्यांना, संचालकांना आणि अधिकाऱ्यांना दिले -------जातात.
(अ) बोनस भाग (ब)
हक्क भाग (क) ईएसओएस
(७)------द्वारा
कंपनी तिच्या प्रतिभूतींची विक्री २०० पर्यंत व्यक्तींच्या समूहाला करते.
(अ) खाजगीरीत्या भाग
विक्री (ब) आयपीओ (क) सार्वजनिक विक्री
(८) -----भाग
वाटपाचा अधिकार असतो.
अ)संचालकाला
(ब) संचालक मंडळाला (क) कंपनीच्या चिटणिसाला
(९) कंपनीकडून
भागांचे वाटप केलेल्या भाग अर्जदारांना --------पाठवले जाते.
अ)दिलगिरी
(ब) नूतनीकरण (क) भाग वाटप
(१०) -------हा
भागांच्या मालकीचा पुरावा आहे.
अ)भाग
प्रमाणपत्र (ब) सभासद रजिस्टर (क) भाग वाटप पत्र
(११) दोन भाग हप्ता
मागणीतील अंतर ---------पेक्षा कमी असू नये.
अ)१४
दिवसां (ब) १ महिन्या (क) २१ दिवस
उत्तरे :
(१) भाग भांडवल (२)
सार्वजनिक भाग विक्री (३) बुक बिल्डिंग (४) प्राथमिक भाग विक्री (५) विदयमान
समहक्क भागधारकांना (६) ईएसओएस (७) खाजगीरीत्या भाग विक्रीद्वारा (८) संचालक
मंडळाला (९) भाग वाटप (१०) भाग प्रमाणपत्र (११) १ महिन्या.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
(१) एका
व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्वेच्छेने भाग जाणे/देणे म्हणजे भाग--------
होय.
अ)हस्तांतरण
‘ब) संक्रमण (क) समर्पण
(२) कायद्यातील
तरतुदींनुसारच्या कृतीमुळे भाग-------- होते.
(अ) जप्ती (ब) वाटप
(क) संक्रमण
(३)कंपनीला
भाग वाटपाचे विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे भाग वाटपापासून दिवसांच्या------
आत सादर करावे लागते.
१)६०
(ब) ४५ (क) ३० (भाग
४) जर ₹ १०० चा भाग
₹ ११० ला विकला, तर असा भाग -------विकला असे म्हणता
येईल.
अ)दर्शनीमूल्यास
(ब) नफ्याने (क) वाढावा घेऊन
(५) भागांचे
हस्तांतरण ही ----------कृती आहे.
अ) स्वेच्छेने
केलेली (ब) कायदेशीर (क) सक्तीने केलेली
६)............तेव्हा
भागांचे संक्रमण होते.
अ) जेव्हा
पूर्ण रक्कम भरली जाते (ब) जेव्हा भाग मागणी रक्कम वेळेत भरली जात
नाही क) जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो
(७) ₹१०० किमतीचा
भाग ९० रुपयांना विकला, तर तो भाग -----------विकला म्हणतात.
(अ) नफा घेऊन (ब)
कसर देऊन (क) प्रव्याजी घेऊन
उत्तरे :
(१) हस्तांतरण (२)
संक्रमण (३) ३० (४) वाढावा घेऊन (५) स्वेच्छेने केलेली (६)
जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो (७) कसर देऊन.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण ४ : कर्जरोखे विक्री
(१) कंपनी
मतदानाच्या हक्कासह -------ची विक्री करू शकत नाही.
(अ) समहक्क भाग (ब)
कर्जरोखे (क) प्रतिभूती
(२) कंपनी--------
परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
(अ) फक्त अंशत: (ब)
फक्त पूर्णतः (क) अंशतः किंवा पूर्णत:
(३) कर्जरोख्यांच्या
परतफेडीसाठी --------खात्यातून निधी वापरला जातो.
(अ) भांडवल (ब)
कर्जरोखे परतफेड राखीव निधी (क) नफा किंवा तोटा
(४) सुरक्षित
कर्जरोख्यांची परतफेड त्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून ---------केली पाहिजे.
(अ) १० दिवसांत (ब)
१० वर्षांत (क) १५ वर्षांत
(५) कंपनीला--------
कर्जरोख्यांची विक्री करताना आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो.
(अ) सुरक्षित (ब)
असुरक्षित (क) परतफेडीच्या
(६) कर्जरोख्यांचे
वाटप झाल्यापासून कर्जरोखे प्रमाणपत्र -------दिले पाहिजे.
(अ) ३ महिन्यांत (ब)
६ महिन्यांत (क) ६० दिवसांत
(७) कर्जरोखे
वाटपाच्या तपशिलाची नोंद -------मध्ये केली पाहिजे.
(अ) कर्जरोखे
नोंदवही (ब) सभासद नोंदवही (क) धनको नोंदवही
(८) कर्जरोखे
वाटपाची कार्यपद्धती कर्जरोखे अर्ज मिळाल्यापासून -----पूर्ण केली पाहिजे.
(अ) ६ महिन्यांत (ब)
३ महिन्यांत (क) ६० दिवसांत.
(९) कंपनी -------कर्ज
उभारते
(अ) साधारण
भागांद्वारे (ब) अग्रहक्क भागांद्वारे (क) कर्जरोख्यांद्वारे
(१०) कर्जरोखे प्रमाणपत्रे
कर्जरोखेधारकास वाटपापासून---------- महिन्यांच्या आत
प्रदान केली पाहिजेत.
(अ)३ (ब) ६ (क) ९
(११) पूर्णतः
परिवर्तनीय कर्जरोख्यांची मुदत संपल्यानंतर -------भाग परिवर्तन होते.
(अ) समहक्क (ब) स्थगित
(Deferred)
(क)
बोनस
उत्तरे :
(१) कर्जरोख्यांची
(२) अंशत: किंवा पूर्णतः (३) कर्जरोखे परतफे राखीव निधी (४) १० वर्षांत (५)
सुरक्षित (६) ६ महिन्यांत (७) कर्जरोखे नोंदव (८) ६० दिवसांत (९)
कर्जरोख्यांद्वारे (१०) ३ (११) समहक्क.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण ५ : ठेवी
(१) ठेव हा ------चा
प्रकार आहे.
(अ) मालकीचे भांडवल
(ब) अल्प मुदतीचे कर्ज (क) दीर्घ मुदतीचे क
(२) खाजगी कंपनी
आपल्या सभासदांकडून किंवा संचालकांकडून पूर्ण वसुल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या --------%
पेक्षा जास्त ठे स्वीकारू शकत नाही.
(अ) १०० (ब) ३५ (क)
२५
(३) -------कंपनीस
आम जनतेकडून पूर्ण वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या ३५% पर्यंत ठेवी स्वीकारता येतात.
(अ) सरकारी (ब)
खाजगी (क) पात्र सार्वजनिक
(४) ठेवी या कमीत
कमी ६ (सहा) महिने आणि जास्तीत जास्त -------महिन्यांसाठी स्वीकारता
येतात.
(अ) ३६ (ब) ३ (क) ३०
(५) कंपनी नोंदणी
अधिकाऱ्याकडे परिपत्रक किंवा जाहिरातीची नोंदणी केल्यानं दिवसांच्या आत ----------परिपत्रक
किंवा जाहिरात प्रसिद्ध करावी लागते.
(अ) ३० (ब) २१ (क) ७
(६) स्वीकारत असताना
कंपनीला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्मा करावा लागतो.
(अ) असुरक्षित ठेवी
(ब) असुरक्षित कर्जरोखे (क) सुरक्षित ठेवी
(७) ठेव
स्वीकारल्यापासून ठेव पावती---------- दिवसांच्या आत
ठेवीदाराल दिली जाते.
(अ) ७ (ब) ३० (क) २१
(८) मुदतीपूर्व ठेव
रक्कम परत करावयाची असल्यास कंपनी -------% कपात (वजा) करते.
अ) १
(ब) १८ (क) २०
(९) ठेव विवरणपत्र
प्रत्येक वर्षी पूर्वी दाखल करणे आवश्यक आहे
(अ) ३० जून (ब) ३१
मार्च (क) ३० एप्रिल
उत्तरे :
(१) अल्प मुदतीच्या
कर्जाचा (२) १०० (३) सरकारी (४) ३६ (५) ३० (६) सुरक्षित ठेवी (७) २१ (८) १ (९) ३०
जून.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
१) ज्या
कंपनीचे स्वत:चे भांडवल------- कोटीपेक्षा कमी आहे, अशी
कंपनी सार्वजनिक ठेवींची मागणी करू शकत नाही.
अ) दहा
ब) दोन (क) एक
(२) ------कंपनीला
ठेव स्वीकारल्यावर ठेव पावती आठवड्यांच्या आत ठेवीदाराला देणे
अनिवार्य आहे.
(अ) दोन (ब) चार क) आठ
(३) ठेवींची परतफेड
महिन्यांच्या -----आत करता येत नाही.
अ) एक
(ब) सहा (क) नऊ
(४) प्रत्येक
कंपनीने पुढील आर्थिक वर्षात परतफेड करायच्या ठेवींच्या एकूण रकमेच्या किमान ----टक्के
रक्कम तरल मालमत्तेत ठेवली पाहिजे.
अ) १०
(ब) १५ (क) २०
(५) ठेव
विवरणपत्राची एक प्रत --------नोंदणीसाठी पाठवावी लागते.
अ) कंपनीच्या
नोंदणी अधिकाऱ्याकडे (ब) भारत सरकारकडे क) स्टेट
बँक ऑफ इंडियाकडे
उत्तरे :
(१) एक (२) आठ (३) सहा (४) १५ (५) कंपनीच्या
नोंदणी अधिकाऱ्याकडे.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण ६ : सभासदांशी
पत्रव्यवहार
(१) संचालक -------हे
असतात.
अ) कंपनीचे
पगारी नोकर (ब) भागधारकांचे प्रतिनिधी क) कंपनीचे धनको
(२) लाभांशाचे वाटप
लाभांश घोषित झाल्याच्या तारखेपासून ------आत सभासदांना झाले
पाहिजे.
(अ) ३० (ब) ४० (क)
२०
(३) नोंदणीकृत
भागधारकांना --------अधिपत्राद्वारे लाभांश मिळतो
(अ) भाग (ब)
कर्जरोखा (क) लाभांश
(४) भागधारकांना
मोफत भाग वाटप केलेल्या भागांना -------भाग म्हणतात.
(अ) अग्रहक्क (ब)
समहक्क (क) बोनस
(५) भाग वाटपानंतर----------महिन्यांच्या
आत कंपनीने भाग प्रमाणपत्रे पूर्ण करून वाटपासाठी तयार ठेवली पाहिजेत.
(अ) ३ ( (ब) ५ (क) २
(६) सभासदांबरोबर
केला जाणारा पत्रव्यवहार हा --------असावा.
(अ) वेळखाऊ (ब) लहान
मार्गी (क) तत्पर व थोडक्यात
(७) लाभांशाची
शिफारस ---------करतात.
(अ) संचालक मंडळ ब)
भागधारक (क) ठेवीदार
(८) लाभांशाचे वाटप
कंपनी -------------मधून करते.
(अ) भांडवला (ब)
इमारत निधी (क) नफ्या
(९) कंपनीच्या
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर करण्यात आलेला लाभांश नोंदणीकृत
भागधारकांना -------दवारे दिला जातो.
(अ) लाभांश अधिपत्र
(ब) व्याज अधिपत्र (क) भाग अधिपत्र
(१०) भाग वाटपाचा
नकार --------पत्राद्वारे कळवला जातो.
(अ) दिलगिरी (ब)
वाटप (क) हप्ता मागणी
उत्तरे :
(१) भागधारकांचे
प्रतिनिधी (२) ३० (३) लाभांश (४) बोनस (५) २ (६) तत्पर व थोडक्यात (७) संचालक मंडळ
(८) नफ्या (९) लाभांश अधिपत्रा (१०) दिलगिरी.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण ७ : कर्जरोखेधारकांशी
पत्रव्यवहार
(१) कर्जरोख्यांद्वारे
जमा केलेले भांडवल हे कंपनीचे-----------भांडवल असते.
(अ) कर्जाऊ (ब)
मालकीचे (क) कायम
(२) कर्जरोखेधारक -------हे
कंपनीचे असतात.
(अ) मालक (ब) धनको
(क) ऋणको
(३) कंपनीस कर्जाऊ
भांडवलाचा -----------पुरवठा करतात.
(अ) समहक्क भागधारक
(ब) कर्जरोखेधारक (क) अग्रहक्क भागधारक
४) नोंदवलेल्या
कर्जरोख्यांवरील व्याज हे------- द्वारे दिले जाते.
(अ) व्याज कूपन (ब)
व्याज अधिपत्रा (क) परतावा आदेशा
(५) -------हे
कंपनीचे धनको असतात.
(अ) भागधारक
(ब) कर्जरोखेधारक (क) संचालक
(६) वाहक
कर्जरोखेधारकांना व्याज हे ----------द्वारे दिले जाते.
अ)व्याज
अधिपत्र (ब) परतावा आदेश (क) व्याज कूपन
(७) कर्जरोख्यांवरील
परतावा हा स्वरूपात ----------स्थिर दराने दिला जातो.
(अ) लाभांश ‘क)
व्याज (ब) कर्ज
(८) -----------हा
असा दस्तऐवज आहे की, ज्याद्वारे कंपनी सही-शिक्क्यानिशी कर्ज घेतल्याची कबुली
देते.
अ) कर्जरोखा
(ब) भाग (क) राखीव निधी
(९) ज्या
कर्जरोख्यांची परतफेड ठरावीक मुदतीनंतर केली जाते, अशा कर्जरोख्यांना -----------कर्जरोखे
म्हणतात.
अ)परिवर्तनीय
(ब) नोंदवलेले (क) परतफेडीचे
(१०) कर्जरोख्यांवर
दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर ------असतो.
(अ) अनिश्चित (ब)
बदलता क)स्थिर
(११)
कर्जरोखेधारकांना कंपनीकडून --------प्रमाणपत्र दिले जाते.
(अ) भाग(ब) बंधपत्र
(क) कर्जरोखा
(१२) व्याज अधिपत्र
हे कंपनीच्या -------ना पाठवले जाते.
(अ) भागधारक (ब)
कर्जरोखेधारक (क) मालक
उत्तरे :
(१)
कर्जाऊ (२) धनको (३) कर्जरोखेधारक (४) व्याज अधिपत्रा (५) कर्जरोखेधारक (६) व्याज
कूपन्स (७) व्याज (८) कर्जरोखा (९) परतफेडीचे (१०) स्थिर (११) कर्जरोखा (१२)
कर्जरोखेधारकांना.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण ८ : ठेवीदारांशी
पत्रव्यवहार
(१) ठेवीदार कंपनीचे
-------असतात.
(अ) सभासद (ब) धनको
(क) ऋणको
(२) ठेवीदार कंपनीला
----------भांडवल पुरवतात.
(अ) अल्प मुदतीचे
(ब) दीर्घ मुदतीचे (क) मध्यम मुदतीचे
(३) कंपनीला जास्तीत
जास्त -----------महिने मुदतीच्या ठेवी स्वीकारता येतात.
(अ) २४ (ब) ३६ (क)
४५
४) कंपनी
कमीत कमी ------महिने मुदतीपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकत
नाही.
अ)६ ब) ३ क)५
(५) ठेवी हे कंपनीचे----------प्रकारचे कर्ज आहे.
(अ) स्थिर (ब) अल्प
मुदत (क) दीर्घ मुदत
(६) सार्वजनिक ठेवी
या----------- भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी स्वीकारल्या जातात.
अ)स्थिर
(ब) खेळत्या (क) मालकीच्या
(७) ----------ला
जनतेकडून ठेवी मागवण्याचा अधिकार आहे.
अ)भागधारका
(ब) अंकेक्षका (क) संचालक मंडळा
(८) ठेवींवरील व्याज
-------दर असतो.
अ)स्थिर
(ब) बदलता (क) माफक
(९) ठेवींच्या
गुंतवणुकीवर पैशाच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या परताव्यास------------
म्हणतात.
(अ) लाभांश (ब)
व्याज क)सूट
(१०) ठेवींच्या
परतफेडीसाठी ठेवीदारांस कंपनीला यथायोग्य तयार केलेली मूळ------- पावती पाठवावी
लागते.
(अ) ठेव (ब) बँक (क) रोख
उत्तरे :
(१)
धनको (२) अल्प मुदतीचे (३) ३६ (४) ६ (५) अल्प मुदत ) खेळत्या (७) संचालक मंडळाला
(८) स्थिर (९) व्याज (१०) ठेव.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण ९ : भागपेढी पद्धती
(१) मध्ये कागदी
रूपात प्रतिभूती ------धारण केल्या जातात.
(अ) भौतिक स्वरूपा
(ब) डिमटेरियलायझेशन (क) डिजिटल
(२) ------पद्धतीमध्ये
विदयमान प्रमाणपत्र गहाळ होण्याचा धोका असतो.
(अ) भौतिक (ब)
डिमटेरियलायझेशन (क) डिजिटल
(३) भागपेढी
पद्धतीमध्ये प्रतिभूती स्वरूपात----------- धारण केल्या जातात.
(अ) प्रमाणपत्र
आधारित (ब) इलेक्ट्रॉनिक (क) भौतिक
४)---------ही
प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणारी संस्था आहे.
(अ) डीपी (ब) इश्युअर कंपनी (क) डिपॉझिटरी
(५) जेव्हा
प्रतिभूतीचे डिमॅटीकरण केले जाते, तेव्हा जात ---------शुल्क दिले नाही.
(अ) जकात (ब)
संपत्ती कर (क) मुद्रांक
(६) भारतात
डिपॉझिटरी कायदा --------मध्ये संमत झाला.
(अ) १९१९ (ब) १९९६
(क) १९९९
(७) भारतात
डिपॉझिटरी------- पद्धती आहे.
(अ) एकल (ब) बहु (क)
एक
(८) -----हा
डिपॉझिटरी पद्धतीचा घटक आहे.
(अ) सरकार (ब)
इश्युअर कंपनी (क) विश्वस्त
(९)----------
ही भारतातील सर्वांत जुनी डिपॉझिटरी आहे.
(अ) डिओ जोन्स (ब)
एनएसडीएल (क) सीडीएसएल
(१०) डिमॅट खाते ---------कडून
उघडले जाते.
(अ) बेनिफिशिअल ओनर
(ब) सीडीएसएल (क) सेबी
उत्तरे :
(१) भौतिक स्वरूपा (२) भौतिक (३) इलेक्ट्रॉनिक ४)डिपॉझिटरी
(५) मुद्रांक (६) १९९६ (७) बहु (८) इश्युअर कंपनी (९) एनएसडीएल (१०)
बेनिफिशिअल ओनर.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
(१) डिमॅट केलेले
भाग------- आहेत.
(अ) अहस्तांतरणीय
(ब) फंगिबल (क) वाहक
(२) प्रतिभूतींना
विशिष्ट ओळख क्रमांक देणे म्हणजे--------- होय.
(अ) आयबीएम (ब)
बीबीएम (क) आयएसआयएन
(३) भारतात संस्थात्मक प्रतिभूतींना आयएसआयएन------------
कडून दिले जातात.
(अ) एनएसडीएल (ब)
केंद्र सरकार (क) राज्य सरकार
(४) -----------आयएसआयएन
साठी आवेदन सादर करावे लागते.
(अ) कंपन्यांना (ब)
डीपींना (क) डिपॉझिटरीला
(५) -----------यांना
डिमॅट खात्याचे शुल्क भरावे लागते.
(अ) गुंतवणूकदार (ब)
इश्युअर (ब) इश्युअर (क) डिपॉझिटरी
(६) एनएसडीएलचे
प्रवर्तक--------- होय.
(अ) एनएसई (ब) बीएसई
(क) एफटीएसई.
(७) सीडीएसएलचे
प्रवर्तक-------------------होय.
(अ) एनएसई (ब) बीएसई
(क) एफटीएसई.
(८) डिमॅटीकरण
म्हणजे--------- होय.
(अ) भौतिक भागांचे
इलेक्ट्रॉनिक प्रकारात रूपांतर (ब) भाग दाखल्याचे भाग अधिपत्रात रूपांतर (क)
भागांचे भागसाठ्यात रूपांतर
(९) डिपॉझिटरी
पार्टिसिपंटकडे --------नंबर ओळख म्हणून असतो.
(अ) आयडी (ब) पॅन
(क) इंडेक्स
(१०) भागांचे ----------हे
दप्तरी काम कमी करते.
(अ) रिमटेरिअलायझेशन
(ब) डिमटेरिअलायझेशन (क) भौतिक हस्तांतरण
उत्तरे :
(१) फंगिबल (२)
आयएसआयएन (३) एनएसडीएल (४) कंपन्यांना (५) गुंतवणूकदार (६) एनएसई (७) बीएसई (८)
भौतिक भागांचे इलेक्ट्रॉनिक प्रकारात रूपांतर (९) आयडी (१०) डिमटेरिअलायझेशन.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण १० : लाभांश आणि
व्याज
(१) लाभांश--------- दिला
जातो
(अ) भागधारकांना (ब)
कर्जरोखेधारकांना (क) ठेवीदारांना
(२)-----------
म्हणजे नफ्यातील हिस्सा जो कंपनीद्वारे भागधारकांना दिला जातो.
(अ) व्याज (ब) भाडे
(क) लाभांश
(३) लाभांशाची
शिफारस -----------करतात.
(अ) व्यवस्थापकीय
संचालक (ब) चिटणीस क) संचालक मंडळ
(४) अंतिम लाभांशाची
घोषणा----------करते.
(अ) संचालक मंडळ (ब)
भागधारक (क) ठेवीदार
५)---------मधून
लाभांश घोषित केला जाऊ शकत नाही.
(अ) भांडवला (ब)
नफ्या (क) राखीव निधी
६) लाभांश घोषित
झाल्यानंतर -------दिवसांच्या आत स्वतंत्र बँक खात्यात लाभांश रक्कम
हस्तांतरित करावी लागते.
(अ) ५ (ब) १५ (क) ५०
(७) लाभांशाची घोषणा
झाल्यानंतर---------- दिवसांच्या आत त्याचे वाटप करावे लागते.
(अ) ३ (ब) १३ (क) ३०
(८) ------------भागधारकांना
उर्वरित नफ्यातून लाभांश दिला जातो.
(अ) समहक्क (ब)
अग्रहक्क (क) कर्जरोखे
(९) लाभांश प्रथम -----------भागधारकांना
दिला जातो.
(अ) समहक्क (ब)
अग्रहक्क क) इतर
उत्तरे :
(१) भागधारकांना (२)
लाभांश (३) संचालक मंडळ (४) भागधारक (५) भांडवला (६) ५ (७) ३० (८) समहक्क (९)
अग्रहक्क.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
(१) न दिलेला लाभांश
कंपनीद्वारे हस्तांतरित केला जातो त्या आयईपीएफची स्थापना -------कडून केली आहे.
(अ) केंद्र सरकार
(ब) कंपनी (क) भागधारक
(२) -------लाभांशाची
घोषणा ही नियमावलीच्या अधिकारानेच केली जाणे आवश्यक आहे.
(अ) अंतरिम (ब)
अंतिम ( (क) बोनस
(३) ---------हा
कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे.
(अ) लाभांश (ब)
व्याज (क) भाडे
(४) -----------चा
कंपनीच्या नफ्याशी संबंध नाही.
(अ) लाभांश (ब)
व्याज
(५) दोन वार्षिक
सर्वसाधारण सभांमधील कालावधीत घोषित केल्या जाणाऱ्या लाभांशास------
लाभांश म्हणतात.
(अ) अंतरिम (ब)
अंतिम (क) वार्षिक
(६) न दिलेला व
मागणी न केलेला लाभांश ---------वर्षेपर्यंत न दिल्यास,
गुंतवणूकदार ‘शिक्षण व सुरक्षा निधी खात्या कडे वर्ग केला जातो.
(अ) तीन (ब) सात (क)
पाच
उत्तरे :
(१) केंद्र सरकार (२)
अंतरिम (३) व्याज (४) व्याजाचा (५) अंतरिम (क) बोनस (६) सात.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण ११ : वित्तीय बाजार
(१) वित्तीय बाजार
असा बाजार आहे, ज्यामध्ये लोक--------------- आणि डेरिव्हेटिव्हज्चा
कमी व्यवहार किमतीवर व्यापार करतात.
(अ) सोने (ब)
वित्तीय प्रतिभूती (क) वस्तू
२) नाणे
बाजार हा ------------मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेण्यासाठी बाजार
आहे.
अ)अल्प
(ब) मध्यम (क) दीर्घ
३)सरकारी
प्रतिभूतींचा बाजार म्हणजेच -------------बाजार होय.
अ) प्राथमिक
(ब) दुय्यम (क) धोका नसलेल्या ठेवींचा
४) ज्या
रोखे बाजारात नवीन रोख्यांची (भाग व कर्जरोखे) विक्री केली जाते त्या रोखे बाजारास
-------बाजार म्हणतात.
अ)प्राथमिक
(ब) दुय्यम (क) सोने-चांदीचा
उत्तरे :
(१) वित्तीय
प्रतिभूती (२) अल्प (३) धोका नसलेल्या ठेवींच (४) प्राथमिक.
चिटणिसाची कार्यपद्धती-
इयत्ता बारावी
प्रकरण १२ : भाग बाजार
१) भाग
बाजार ही एक अशी जागा आहे, जेथे भाग दलाल व व्यापारी ----------च्या खरेदी-विक्रीचे
व्यवहार करतात.
(अ) सोने (ब)
प्रतिभूती (क) वस्तू
(२) --------हा
भारतीय प्रतिभूती करार नियमन कायदयांतर्गत नोंदवलेल भारतातील पहिला भाग बाजार
म्हणून ओळखला जातो.
(अ) बीएसई (ब) एनएसई
(क) ओटीसीईआय
(३) मुंबई भाग बाजाराचे
स्थापना --------वर्ष आहे.
(अ) १८७५ (ब) १८५०
(क) १९७५
(४) बॉम्बे स्टॉक
एक्स्चेंजमधील व्यवहार प्रणालीला -----------म्हणतात.
अ)बोल्ट
(ब) ओटीसीईआय (क) एनएसई
(५) भांडवल बाजारावर
नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था म्हणजे
अ)एनएसई
(ब) बीएसई (क) सेबी
६) स्टॉक
एक्स्चेंज नियमन व नियंत्रणाखाली कार्यरत असते.
(अ) सभासदांच्या (ब)
सेबीच्या (क) प्रतिभूती नोंदणी समितीच्या
उत्तरे :
(१) प्रतिभूती (२) बीएसई (३) १८७५ (४) बोल्ट (५) सेबी (६) सेबीच्या.
वरील सर्व प्रश्न बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्व पूर्ण आहे त्यासाठी आपल्या मित्रांना लगेच share व ब्लॉग ला follow करा.
खालील लिंक (link) कॉपी करा व शेअर करा.
https://shrikant89.blogspot.com/2022/02/hscboardexam.html
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.