google-site-verification: googlea24dc57d362d0454.html श्री. संदीप प्रदीप परब यांना कोरोना रोगाच्या काळात आलेला गुरुमाऊलींचा अनुभव .................श्री स्वामी समर्थ

श्री. संदीप प्रदीप परब यांना कोरोना रोगाच्या काळात आलेला गुरुमाऊलींचा अनुभव .................श्री स्वामी समर्थ

https://shrikant89.blogspot.com
|| श्री स्वामी समर्थ ||



          मी संदीप प्रदीप परब, माऊलींच्या आय-टी समितीमध्ये  सेवा करत आहे मला साक्षात गुरुमाऊलींचा  आलेला अनुभव सांगत आहे.

             दिनांक ०३-जून-२०२१ रोजी रात्री १२.०० ते १.००  च्या सुमारास अचानक माझ्या १० महिन्यांच्या मुलाला भरपूर ताप भरून आला. १०० च्या वर ताप गेला होता काय करावे काहीच सुचत नव्हते आणि रात्री लहान मुलांचे डॉक्टर पण भेटणे मुश्किल त्यामुळे रात्री त्याला तापाचे औषध दिले आणि मिठाच्या पाण्याच्या घड्या त्याच्या डोक्यावर ठेवत होतो, पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान तो एकदम शांत झाला त्याची हालचाल कमी झाली होती,आम्ही खूपच घाबरलो, लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरांनी तपासले आणि ऍडमिट करून घेण्यास सांगितले आमच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण रोज हसत खेळत मस्ती करणारा माझा मुलगा अचानक शांत झाला होता, ताप जास्त असल्यामुळे डॉक्टरांनी कोरोना रिपोर्ट करण्यासाठी सांगितले आम्ही आणखी घाबरून गेलो एवढ्या कमी वयाच्या जीवावर ही काय वेळ आली होती आमचे अश्रू थांबत नव्हते, माऊलींची मनोमन प्रार्थना केली आता सर्व तुमच्यावर सोपवले आहे माझा मुलगा बरा झाला पाहिजे.

             माऊलींना बाळाचा फोटो पाठवला आणि त्याला काय काय होत आहे ते सविस्तर सांगितले, त्यांनी डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे उपचार सुरु ठेवण्यास सांगितले

             ऍडमिट केल्यावर बाळाला २ बॉटल सलाईन चढवले आणि थोड्या वेळात त्याला जुलाब सुरु झाले तो पूर्णपणे अशक्त झाला होता शरीरातील सर्व त्राण निघून गेला होता आमचा माउलींचा धावा सुरु होता मुलगा बरा होण्यासाठी मनोमन त्यांना प्रार्थना करत होतो त्यानंतर दुपारी त्याचा ताप हळू हळू कमी झाला आणि थोडा हालचाल करू लागला, संध्याकाळपर्यंत ताप पूर्ण निघून गेला आणि तो नेहमीप्रमाणे खाऊ लागला आणि दूध पिऊ लागला

            डॉक्टरांनी २४ तास हॉस्पिटल मध्ये दवाखान्यात  ठेवण्यास सांगितले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला आम्ही माऊलींचे आभार मानले माझा मुलगा सुखरूप घरी आला होता.

              दुसऱ्या दिवशी गजलक्ष्मी अँप मधून समस्या बुकिंग केली, माऊलींचे मनापासून आभार मानायचे होते.  त्यानुसार आमची समस्या झाली आणि पुढे माऊली जे काही बोलल्या ते ऐकून आम्हाला धक्काच बसला

              माऊलींचे उदगार प्रत्यक्ष त्यांच्या शब्दात: तुमच्या मुलाला कोरोनाचाच संसर्ग झाला होता पण ते विषाणू  बाहेर कसे काढायचे म्हणून आम्ही त्याला जुलाब सुरु केले आणि जुलाब वाटे सर्व विषाणू बाहेर काढले, संदीप परब यांचे आमच्यावर प्रचंड प्रेम आहे तसेच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा भरपूर आहे त्यामुळे आम्हाला माऊली म्हणून  माझ्या लेकरांसाठी हे सर्व करणं भाग होत.

               धन्य ती सद्गुरुमाऊली आणि धन्य त्यांची माया, स्वामीजींचे आभार मानावे तितके कमीच आज माऊलींमुळे माझा मुलगा सुखरूप आहे, त्यांनी आम्हाला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढले कारण पुढच्या परिस्थितीचा आम्ही विचार देखील करू शकत नव्हतो.

             खरंच सद्गुरू नेहमी भक्तांच्या हाकेला धावतातच म्हणून म्हणतो  सद्गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी

                म्हणून माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की गुरुमाऊलींना सर्वस्व अर्पण  करून  गुरूसेवेत स्वतःला वाहून घ्या, आपली माऊली आपल्या पाठीशी सदैव उभी असते. आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपल्याला असे गुरू लाभले आहेत.

 

 

|| श्री स्वामी समर्थ ||


Post a Comment

0 Comments

Close Menu