google-site-verification: googlea24dc57d362d0454.html
![]() |
|| श्री स्वामी समर्थ || |
परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने जीवनदान
माझा भाचा तुषार सानप वय ५ वर्षे यास एक दिवस ताप येण्याचे निमित्त झाले. मेंदुज्वर झाला आणि तुषार बेशुद्धच झाला. त्याच अवस्थेत तुषारला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. सात दिवस औषधोपचार झाले; परंतु दुर्दैव! तुषारच्या प्रकृतीत काहीही फरक पडत नव्हता.
डॉक्टरांनी घरी घेऊन जाण्यास सांगितले. सर्वाचाच धीर खचला. त्यावेळी तेथील नर्सने आम्हाला धीर व माहिती दिली आणि सांगितले की, श्रीक्षेत्र दिंडोरी येथे प. पू. गुरुमाऊलींच्या दर्शनाला घेऊन जा. ते काही आम्ही ऐकले नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेथील नर्सने आम्हांना विनंती केली.
अखेरचा उपाय म्हणून अत्यवस्थ बालकाला प. पू. गुरुमाऊलींच्या दर्शनाला नेण्यात आले. गुरुवारचा दिवस सेवेकऱ्यांची गर्दी दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास आम्ही दिंडोरीला आलो. प. पू. गुरुमाऊलींनी अमृतदृष्टीने तुषारकडे पाहिले. आम्हाला काही सेवा समजावून सांगितली आणि ते म्हणाले,"१२ तासात मुलगा शुद्धीवर येईल."
प. पू. गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे तत्काळ काही सेवा केली आणि आश्चर्य प. पू. गुरुमाऊलींच्या वचनाप्रमाणे दिलेल्या मुदतीत तुषार शुद्धीवर आला. आई-वडील आणि डॉक्टरांना झालेला आनंद अवर्णनीय होता. तुषारची प्रकृती सुधारू लागली कारण त्याचा पुनर्जन्म झालेला.
गुरुमाऊली हेच परब्रह्म भगवान दत्तगुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत हे कळले.
||श्री स्वामी समर्थ||
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.