google-site-verification: googlea24dc57d362d0454.html प.पु. गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने पुत्ररत्न प्राप्ती - नासिर खान रा. अकोला (विदर्भ ) यांचा अनुभव

प.पु. गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने पुत्ररत्न प्राप्ती - नासिर खान रा. अकोला (विदर्भ ) यांचा अनुभव

 परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने पुत्ररत्नाची प्राप्ती

             मी नासिर खान रा. अकोला (विदर्भ )असून मी गेल्या दीड वर्ष झाले   गुरुमाऊलींच्या संपर्कात असून, श्रीक्षेत्र दिंडोरी येथे नियमित येत असतो. सेवेत आल्यापासून माझ्या जीवनात पूर्णतः परिवर्तन झाले आहे. 

             मला संतती सुख नव्हते. त्या दुःखातच मी  गुरुमाऊलींकडून संततीसाठी सेवा घेतली. धर्मपरिवर्तन न करता, कुठल्याही अध्यात्मिक सेवांची जबरदस्ती न करता मला व माझ्या पत्नीला इस्लामी धर्माची सेवा दिली. 

              त्यामध्ये परमपुज्य गुरुमाऊलींनी 'कुराण वाचणे ', '५ फकिरांना खाना देणे ', आणि 'दर्ग्यावर चादर चढविणे' हि सेवा दिली. त्या अनुषंगाने माझ्या पत्नीला एक महिन्याच्या कालांतरामध्येच दिवस राहिले. हा चमत्कार केवळ परमपपुज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने झाला. त्या आनंदातच मीं माझ्या मुलाच्या नामकरणासाठी  गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असता, गुरुमाऊलींनी मुलाचे नाव आझाद खान असे सुचवले.आणि उभयतांनी तो प्रसाद समजून रुजविले.

             गुरुमाऊलींच्या चरणी हिच एक विनवणी आहे कि, जगातील हिंदू धर्मातील लोकांसोबत सर्व धर्मातील लोकांवर असाच कृपेचा वर्षाव करीत रहा.
                                                           
               || श्री स्वामी समर्थ ||

Post a Comment

2 Comments

Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.

Close Menu