google-site-verification: googlea24dc57d362d0454.html ऑनलाईन सामूहिक सप्तशक्ती पाठ केल्याचा अनुभव......................

ऑनलाईन सामूहिक सप्तशक्ती पाठ केल्याचा अनुभव......................

|| श्री स्वामी समर्थ ||
श्री.उज्वल संजय चौधरी ,
श्री स्वामी समर्थ केंद्र,जयहिंद नगर,
शेंदुर्णी, तालुका – जामनेर,
जिल्हा – जळगाव

                आज जगात करोनाचे थैमान चालू असतांना माझ्या आईला सुद्धा करोनाची लागण झाली होती. २६ एप्रिल ला आई पॉझिटीव्ह आली, त्यानंतर ५ दिवस ती दवाखान्यात ऍडमिट होती, आई ला ३० तारखेला घरी आणले असता तिची तब्बेत जास्त खराब होऊ लागली तिची ऑक्सिजन पातळी ९२ – ९३ येऊ लागली आम्ही तिघेही खूप घाबरलो होतो त्या रात्री आई ला खूप धाप लागत होती. आम्ही रात्रभर आई जवळ जागीच होतो.
             सकाळी कुमावत काकांना फोन केला असता काकांनी फोन वर सेवा दिली, धूमावती मंत्र , श्री स्वामी समर्थ मंत्र, महा मृत्युंजय मंत्र यांचे तीर्थ आणि धूमावती तीर्थ देण्यास सांगितले तसेच दशमुळं काढा , तुलसी काढा , इमून प्लस काढा , व भीमसेन कपूर पाण्यात टाकून वाफ घेण्यास सांगितले व सेवा सुरु केली तरीही  ऑक्सिजन पातळी ९२ -९३  होती. 
             १ मे ला संध्याकाळी आम्ही सामूहिक ऑनलाइन सप्तशती पाठाला बसलो पाठ चालू असतांना ऑक्सिजन चेक केला असता ९६ आला, तसेच घरात श्री स्वामी समर्थ मंत्र , महा मृत्युंजय मंत्र,धूमावती मंत्रांचा जप चालूच होता त्यानंतर आई च्या तब्बेतीत सुधारणा होऊ लागली. आज आईची तब्येत श्री स्वामी समर्थ कृपेने चांगली आहे .

                       || अशक्य ही शक्य करतील स्वामी || 

Post a Comment

0 Comments

Close Menu