 |
|| श्री स्वामी समर्थ || |
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा अनुभूती चा मार्ग असल्याची प्रचिती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वाळकी – एकबुर्जी रोड वाशिम येथील अनुभुती महिला सेवेकरी ताई ला आली.
ग्रामअभियान अंतर्गत सुरू असलेल्या केंद्रातील ताई चा परिवार स्वामी सेवेकरी आहे , ताईच्या मुलीचे लग्न सन २०१९ मध्ये अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाले काहीच दिवसांनी आपली मुलगी आई होणार अशी बातमी कळाली ती श्री स्वामी ची कृपा म्हणून सर्वांनी स्वामी चे आभार मानले.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते ,नियमित तपासणी करण्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये ताई अमरावती येथे डॉक्टरांकडे गेल्या पण डॉक्टरांनी त्याना सांगितले की,ताईच्या पोटात ज्या बाळाचा गर्भ आहे तो खराब झाला असून तो लवकरात लवकर काढून टाकावा लागतो जर काढला नाही तर आईच्या पण जीवाला धोका निर्माण होतो नंतर त्या ताईनी चार ते पाच डॉक्टरांचा सल्ला घेतला सर्वाचे तेच मत आले.
ती ताई आपल्या आईला घेऊन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वाळकी – एकबुर्जी रोड ,वाशिम येथे आल्या त्यानी प्रश्नोत्तरी करणाऱ्या ताई ला आपला प्रश्न सांगितला , ताई नी त्याना स्वामी महाराजांना नारळ (श्रीफळ) ठेवायला सांगून सेवा दिली आणि त्यांना लगेच श्री क्षेत्र दिंडोरी येथे जाऊन परमपुज्य गुरुमाऊलींचा व आदरणीय चंद्रकांत दादासाहेबांच्या दरबारात जायायला सांगितले.
सेवेकरी ताईनी वेळ न जाऊ देता आपल्या आई बाबा सह श्रीक्षेत्र दिंडोरी दरबारी प पु गुरुमाऊली च्या समोर आपला प्रश्न मांडला गुरुमाऊली नी त्याना भरभरून आशिर्वाद दिला आणि “ लवकरात लवकर पेढा घेऊन यायला सांगितला" व आदरणीय दादासाहेबांनी पण “ तुमच्या मनासारखे होईल व लवकर बाळाला घेऊन या"असा आपला कृपाआशिर्वाद दिला.
दिनांक-५/५/२०२१ ला ताईने एक सुंदर मुलाला जन्म दिला आहे विशेष म्हणजे बाळ व आई दोघांची तब्बेत एकदम ठणठणीत आहे ,ताईनी परमपुज्य गुरुमाऊली, आदरणीय दादासाहेबांचा प्रसाद म्हणून स्वीकार केला.
"जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते"
हा फक्त आणि फक्त प पु गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादा चा कृपा आशिर्वाद आपला हा अनुभुती चा मार्ग आहे.
"अशक्य हि शक्य करतील स्वामी गुरुमाऊली"
2 Comments
Shree Swami Samarth
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ
ReplyDeleteThank you / आभारी आहोत.
Please share and follows.