google-site-verification: googlea24dc57d362d0454.html
श्री शंकर महाराज
श्री शंकर महाराजांना मनोभावे नमस्कार करून मला एक अनुभव शेअर करावासा वाटतो.........मी कल्पना प्रभुदेसाई (रवी निमकर पूणे याची बहिण). माझ्या घरात माझी सख्खी जाऊ ही कुठलीही लक्षण नसताना अचानक आजारी पडली तिची ऑक्सिजन लेव्हल प्रमाणापेक्षा खाली 88 वर गेली . लगेचच हालचाली केल्या पण कुठल्याच हॉस्पिटल मध्ये तीला अॅडमिट करण्यासाठी बेड मिळेना, आमचं संपूर्ण कुटुंब चिंतित झालं. बरं आम्ही लांबून काहीच करू शकत नव्हतो, लोकडाऊन मुळे तिथे जाऊ शकत नव्हतो. काळजी मात्र वाढत होती कारण सद्याच्या स्थितीत ऑक्सीजन कमी होणे ही चिंतेची च बाब आहे. अशातच मझ्या जावेला एका हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करून घेतलं. नंतर शेवटी मी माझ्या भावाशी फोनवरून सर्व काही सांगितले, की जो शंकर महाराजांचा निस्सीम भक्त आहे. त्याला म्हटलं मला काहीतरी उपाय सांग की यातून माझी जाऊ बाहेर पडेल. त्याने मला एक मंत्र सांगितला की जो अख्ख्या विश्वासाठी उपयोगी आहे फक्त मला म्हणाला की जे काही करशीलते श्रद्धेने कर, महाराजांना कळकळीची प्रार्थना करून ब तुम्ही सगळे ह्या काळजीतून बाहेर पडाल हा विश्वास त्याने मला दिला.
जन पद विध्वंस हारे || राम कृष्ण हरे मुरारे || शिव शंकराय नमः
मी या मंत्राचा १०८ वेळा जप केला, देवाचं सगळं आवरलं आणि कामाला लागले. आणि तुम्हाला सांगते सायंकाळी ४.०० वाजताच्या दरम्यान मला बातमी मिळाली की, माझ्या जावेची ऑक्सिजन लेव्हल पाहिजे तेवढी वाढलेली होती. 98 वर आली. आम्हां सर्व कुटुंबाला महाराजांनी काळजीतून बाहेर काढले.
।। जय श्री शंकर महाराज ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.